Apply Kusum Yojana Online :कुसुम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती

Apply Kusum Yojana Online भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असून सध्या भारतामध्ये 30 दशलक्ष हून अधिक कृषी पंप स्थापित आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ दहा लक्ष ठेवून अधिक कृषी पंप हे आजही डिझेलवर आधारित आहे.

त्यामुळे या पंपांना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची गरज असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीला पाणी देता यावं यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी एक यशस्वी योजना राबवलेली आहे.

ही फलदायी योजना म्हणजेच महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम ब योजना. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना किफायत शेत आणि सिंचनासाठी पंपांना दिवसा वीजपुरवठा करता येण्यासाठी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचा महा कृषी ऊर्जा प्रधानमंत्री कुसुम ब योजनेचा मानस आहे.

Apply Kusum Yojana Online या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख रेशनविरहित सौर कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्टे आहे. राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध होत नाहीये त्या ठिकाणी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा दहा टक्के तर अनुसूचित जाती जमाती वर्गातील शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांचा हिस्सा हा पाच टक्के असणार आहे.

Apply Kusum Yojana Online

या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष

  • शाश्वत जल स्त्रोत उपलब्ध आहे पण पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नाही असे सगळे शेतकरी यासाठी पात्र राहतील.
  • अडीच एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यास तीन अश्वशक्ति क्षमतेचा
  • अडीच ते पाच एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यास पाच अश्वशक्ति क्षमतेचा पाच पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप देण्यात येईल.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहिरी बोरवेल यांचे मालक तसेच बारमाई वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीनदार शेतकरीही या योजनेसाठी पात्र राहतील.
  • या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु सौर कृषी पंप वाटप न झालेले लाभार्थी व महाकृषी उर्जा अभियान निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ घेता येईल.
  • साडेसात अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचे सौर कृषी पंप बसू इच्छिणारे शेतकरी साडेसात अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र राहतील.

Apply Kusum Yojana Online योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा

  • Https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b या वेबसाईटवर जाऊन योग्य ती माहिती भरा.
  • योग्य भरल्यावर अर्ज दाखल करा या बटणावर क्लिक करा.
  • दिलेली माहिती बरोबर असल्याचे खात्री करून होय पुढे चला या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज नोंदणी केल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल हा ओटीपी टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर युजर नेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी ऐकून आठ स्टेप आहेत.

  • १ डिझेल पंप असेल तर त्या पंपाची माहिती भरावी आणि पंप नसेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • २ अर्जदाराने वैयक्तिक आधार कार्ड नंबर नाव मोबाईल नंबर व जमीन विषयक माहिती भरून दाखल करा या बटणावर क्लिक करणे.
  • ३ अर्जदाराने निवासी पत्त्याची सर्व माहिती दिल्याप्रमाणे भरून अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करावं
    • आपण भरलेली माहिती ही अचूक असेल तर होय पुढे चला या बटनाला क्लिक करा.
  • ४ जलास्त्रोत व सिंचन माहिती यामध्ये अर्जदाराने जलस्त्रोत व सिंचन याबद्दल सर्व माहिती दिल्याप्रमाणे भरून दाखल करा या बटनाला क्लिक करा.
  • ५ पिकांची माहिती या पर्यायामध्ये अर्जदाराने मागील वर्ष घेतलेल्या पिकाबद्दलची सर्व माहिती दिल्याप्रमाणे भरून दाखल करा या बटणावर क्लिक करा.
  • ६ आवश्यक पंपाची माहिती या पर्यायांमध्ये अर्जदाराने आवश्यक पंपाचे सर्व माहिती दिल्याप्रमाणे भरून दाखल करा या बटणावर क्लिक करा.
    • यात अडीच एकरापर्यंत तीन एचपीटीसी पंप तर
    • अडीच एकर ते पाच एकर जमिनीपर्यंत पाच एचपी डीसी पंप
    • व पाच एकर पेक्षा जास्त जमिनी करता साडेसात एचपी डीसी पंप मिळणे शक्य आहे.
  • ७ बँकेची माहिती या पर्यायांमध्ये अर्जदाराने बँकेचे सर्व माहिती दिल्याप्रमाणे भरून दाखल करा या बटनावर क्लिक करा
    • यात अर्जदाराने बँक खात्याची सर्व माहिती द्यावी.
  • ८ पुढचा पर्याय आवश्यक कागदपत्रे अपलोड करा असेल
    • शेतीचा सातबारा उतारा
    • विहीर कोपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे.
    • एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटा धारकाचे न हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
    • आधार कार्डची प्रत
    • रद्द केलेला धनादेश प्रत किंवा बँक पासबुक प्रत
    • पासपोर्ट आकाराचे फोटो छायाचित्र
    • शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
    • अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • ही कागदपत्रे कुसुम पोर्टलवर अपलोड करून दाखल करा या बटनावर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर हमीपत्र वाचून घोषणापत्र समोर दिलेल्या बॉक्स वरती क्लिक करून अर्ज दाखल करा या बटणावर क्लिक करा.

हेही नक्की पहा

Apply Kusum Yojana Online

  • आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज प्राप्त होईल सदर संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला पात्र सौर पंपासाठी कोटेशन प्राप्त होईल.
  • यानंतर पंपासाठी भरावे लागणारी रक्कम पैसे भरा या बटणावर क्लिक केल्यानंतर दिसेल.
  • अर्जदाराने पंपासाठी दिलेल्या रकमेचा ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा ज्या लाभार्थींना महाऊर्जामार्फत पैसे भरण्यासाठी एसएमएस केला जातो ते एसएमएस मिळालेले शेतकरी सेल्फ सर्वेसाठी पात्र राहतील.
  • लाभार्थी हिस्सा पोर्टल द्वारे प्राप्त झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास वेंडर सिलेक्शन पुरवठादार निवडीचा पर्याय देण्यात येतो.
  • लाभार्थ्यांने त्याच्या निवडीनुसार पुरवठादार या पर्यायावर क्लिक करून पुरवठा दराची निवड करावी.
  • लाभार्थ्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून देरिफिकेशन या बटनावर क्लिक करा.
  • महा ऊर्जामार्फत एसएमएस आल्यावरच लाभार्थी हिस्सा ऑनलाइन पद्धतीने भरावा नजर चुकीने अथवा तांत्रिक अडचणीमुळे दुबार लाभार्थी हिस्सा महा ऊर्जा कडे जमा झाला असेल तर लाभार्थी हिस्सा शेतकऱ्यांना परत करण्यात येतो.
  • पुढे महाऊर्जा प्रतिनिधी किंव्हा लाईनमन लाभार्थी शेतकरी आणि पुरवठादार प्रतिनिधी यांच्याद्वारे जॉईंट सर्वे केला जाईल.
  • त्यानंतर सौर कृषी पंप स्थापनेचे काम पूर्ण केलं जाईल.
  • सौर कृषी पंप आस्थापनेचे काम पूर्ण झाल्यानंतर महा ऊर्जा प्रतिनिधी लाभार्थी शेतकरी आणि पुरवठादार प्रतिनिधी यांच्यामार्फत जॉईंट इन्स्पेक्शन करण्यात येते.
  • प्रधानमंत्री कुसुम ब योजनांच्या फसव्या जाहिराती पासून लाभार्थी शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.

Vidyut kayda power tower: शेतातून लाईन गेली आता मिळणार इतका मोबदला…

Atal Jal Yojana महाराष्ट्रात अटल भूजल योजना लागू

Leave a Comment

error: Content is protected !!