Panjabrao Dakh :डकसाहेब हवामानाचा अंदाज लावतात कसा

Panjabrao Dakh सध्या महाराष्ट्रात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडतो. तस हे सुरू व्हायला पाऊस पडायचा पण अवकान नसतो जरा आभाळ भरून आलं की शेतकऱ्याच्या कपाळावर पहिले आठी येते. कुठे पेरणी करायची असते कुठे पीक हातात येणार असतं आणि हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून घेतो. आता पाऊस कधी येणार कधी उघडणार किती येणार याचा परफेक्ट अंदाज लावणं आणि लावलेल्या अंदाजावर लोकांनी विश्वास ठेवणे हा काय सोपा विषय नाही.

 • पण जेव्हा अंदाज लावणारच नाव पंजाबराव डक असतं तेव्हा अंदाज ही अचूक लागतो,
 • आणि लोकांचा विश्वासही बसतो. महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस नावांपैकी एक पंजाबराव करतात काय तर ते हवामानाचा अंदाज सांगा अंदाज सागतात एकदम सोप्या भाषेत म्हणाजे उग नैऋत्य दिशा कुठली यावर डोकं लावाव लागत नाही.
 • अंदाज शोधायला वेबसाईटवर जाव लागत नाही.
 • तर व्हाट्सअप आणि युट्युब वर सगळे समजले.
 • नुसता अंदाज सांगितला आणि विषय सोडून दिला असे ही नाही.
 • माणूस असा की पेरणी कधी करावी, शेतीच्या नैसर्गिक पद्धती कश्या वापरावेत, माहिती हे देतात तेही फुकट.
 • पंजाबराव डक मूळचे परभणीच्या सेलू तालुक्यातल्या गुगळी धामणगावचे
 • घरचा व्यवसाय शेतीच, त्यांच्या वडिलांचे शेतीत खूप नुकसान व्हायचं आणि त्याला कारणीभूत असायचा निसर्गाचा लहरीपणा.
 • पण नुकसान झालं म्हणून खचून जाणार डक परिवार नव्हतं
 • हे नुकसान कसं रोखता येईल म्हणून पिता-पुत्र टीव्हीवर हवामानाचा अंदाज बघायचे
 • ह्या अंदाजवेळी IMD उपग्रहाचे चित्र टीव्हीवर दाखवायचे पंजाबराव हे चित्र लक्षात ठेव त्यावरून नोंदणी काढायचं.
Panjabrao Dakh

हवामानाविषयी पंजाबराव यांना लहानपणापासूनच छंद

 • तर हे सगळ कधी तर आठवीत असताना १९९९ ला हा माणूस मुंबईत गेला.
 • आपण मुंबईत गेल्यावर काय करतो तर मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल बघतो.
 • पण पंजाबराव यांनी मुंबईला गेल्यावर कुठे भेट दिली? तर वेद शाळेला.
 • एवढेच नाही तर माणसान छंदपाई रोज परभणीला अपडाऊन केलं छंद कुठला तर कॉम्प्युटरवर उपग्रह बघणेचा.
 • त्यासाठी त्यांनी CDDC चा कोर्सही केला.
 • या सगळ्यात पंजाबरावांच्या डोक्यात गोष्ट आली जस आपण आपल्या शेतीसाठी हवामानाची नोंद ठेवतो.
 • तशीचगत महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांची आहे.
 • मग हे अंदाज त्यांना समजतील अशा भाषेत सांगितले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर.
 • पण ही आयडिया त्यांच्या डोक्यात आली २००३-०४ साली तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं असलं तर मेसेज हाच एक पर्याय होता.
 • पंजाबरावांनी एक बटन वाला फोन घेतला त्यालामेसेजला रुपया जातोय याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम सुरू ठेवल.
 • त्याचवेळी त्यांच्या कापसाच्या शेतीची आजूबाजूच्या गावांमध्ये जोरदार चर्चा व्हायची.
 • शेतकरी शेती बघायला यायचं तेव्हा हा माणूस एक वही घेऊन बसायचा आणि सगळ्या शेतकऱ्यांचे नाव गाव आणि नंबर लिहून ठेवायचा.
 • त्यांना माहीत होत ह्या गोष्टीचा पुढे जाऊन फायदा होईल, हा फायदा कधी झाला तर सोशल मीडिया व्हाट्सअप या गोष्टी आल्यावर पंजाबराव डक राज्यातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवले.
 • तेही जिल्हा आणि विभागानुसार आजच्या घडीला डक ह्यांचे ७०० पेक्षा जास्त whatsapp ग्रुप आहेत.
 • त्यावरून डक ह्यांचा हवामानाचा अंदाज काही मिनिटात महाराष्ट्रभर जातो.
 • व्हाट्सअपच नाही तर स्वतःच्या यूट्यूब चैनल वरून ते हवामानाची माहिती देतात.
 • थोडेफार सोडले तरी युट्युब चे व्हिडिओ लाखाच्या खाली वियूज नसतात, कारण पेरणी काढणे आणि पाऊस ते कसं आणि किती पडणार हे पार विभागानुसार समजत.

अण्णासाहेब पाटील महामंडळ सुधारित कर्ज योजना

हवामानाचा अंदाज सांगतात सांगतात तरी कस

 • त्यासाठी ते मदत घेतात दोन गोष्टी ची SKY MATE आणि IMD ह्या दोन संस्थांकडून हवामानाचे अंदाज आणि उपग्रहाकदून मिळणारी माहिती मिळते त्याचा पंजाबराव अभ्यास करतात.
 • त्या माहितीच्या जोरावर ते पुढच्या पंधरा दिवसांच्या हवामानाचा अंदाज सांगू शकतात.
 • दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे इंडिकेटर, जेव्हा पासून पंजाबराव यांना हवामानाचा निरीक्षण करण्याची गोडी लागली तेव्हापासून ते निसर्गात होणारे बदलत टीपायचे.
 • पाऊस कधी पडणार यासाठीचे त्यांचे नैसर्गिक इंडिकेटर ठरलेला आहे.
 • जर सूर्य मावळताना आकाशात रंग लाल किंवा तांबडा असेल तर पुढच्या ७२ तासांमध्ये पाऊस पडतो.
 • हेच जर वारवाहन थांबल आणि उकडायला लागले की पाऊस येतो.
 • संध्याकाळच्या वेळी ट्यूबलाईट किंवा दिव्याजवळ पाकोळ्या जमा झाल्या की पावसाची शक्यता जास्त असते.
 • यापेक्षा भारी गोष्ट आहे विमानाची जर पावसाळ्याच्या दिवसात आकाशातून विमान जात असेल आणि त्याचा आवाज खाली जमिनीवर आला तर पुढच्या ७२ तासात फिक्स पाऊस पडणार.
 • कारण जेव्हा पाण्याचे ढग वर असतात तेव्हाच विमानाचा आवाज येतो असे डक ह्यांचा अनुमान आहे. पण हे झालं पाऊस येण्याबद्दल

Panjabrao Dakh पाऊस किती येणार हे कसे समजत

 • पाऊस किती येणार हे समजत कावळ्यामुळे पंजाबराव सांगतात जेव्हा कावळे झाडाच्या टोकाला घरट बांधतात,
 • त्यावर्षी पाऊस कमी पडतो. जेव्हा ही घरटे झाडाच्या मध्यभागी बांधले जातात, तेव्हा पाऊस जास्त होतो.
 • मान्सून कधी येणार हा अंदाज जसा महत्वाचा असतो, तसाच मान्सून कधी जाणार हा अंदाज सुद्धा महत्त्वाचा असतो.

कृषी विभागात सरळ सेवा भरती

मान्सून कधी जातो

Panjabrao Dakh पंजाबराव डक ह्यांनी याबाबत सुद्धा निरीक्षण नोंदवले, जर धुक पडलं आणि पिकांवर जाळी आली की पुढच्या बारा दिवसांमध्ये मान्सून जातो.

दुष्काळाचा अंदाज कसा लावतात
 • पंजाबराव दुष्काळाचा अंदाज लावतात ११ जूनला त्यादिवशी जर सूर्याला घळ आली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो.
 • पण असे एक नाही अनेक नैसर्गिक इंडिकेटर वापरून पंजाबराव डक कोट्यावधी शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज सांगतात.
 • ह्याच्या आधारे शेतकरी पेरणी पासून कापणी पर्यंत बऱ्याच गोष्टी ठरवतात, आणि करतात.
Panjabrao Dakh यांच्या अंदाज कायम बरोबर येतात का?
 • तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः पंजाबराव यांनी अनेक ठिकाणी दिले.
 • ते म्हणतात माझे अंदाज कधीच चुकत नाही अगदी एखाद्या गावात पावसाचा अंदाज नसताना पाऊस पडला तर त्या गावात वाऱ्याची दिशा कशी बदलली आहे?
 • दाब किती आहे, या गोष्टींमुळे फरक पडतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्या पलीकडे माझे अंदाज चुकत नाही.
 • मी जगातल्या कुठल्याही ठिकाणचे हवामानाचा अंदाज वर्तवू शकतो.
 • तेही त्या वर्षांचा अभ्यास आणि निरीक्षणाच्या जोरावर सुरुवातीला आपल्या शेतीच्या नुकसानामुळे तयार झालेल्या गरजेला पंजाबराव डक यांनी आवडीमध्ये बदलल.
 • अंशकालीन शिक्षक म्हणून काम करताना मिळणारा वेळ त्यांनी या कामात गुंतवला.
 • पदरचे पैसे घालून हा माणूस गावोगावी फिरू लागला.
 • आजही पंजाबराव वेगवेगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना भेटतात हवामानाचे नैसर्गिक इंडिकेटर कसे ओळखायचे हे त्यांना समजवतात,
 • आधुनिक पद्धतीच्या शेती बद्दल मार्गदर्शन करतात.
 • त्यांचे व्हाट्सअप ग्रुप सगळ्या महाराष्ट्रभर पसरले व्हिडिओचे वाट तर महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांमध्ये शेतकरी ही बगतात.
 • पंजाबराव डक यांनी शेतकऱ्याची शेती करण्याची पावसाचं वेळापत्रक समजून घेण्याची पद्धत बदलली,
 • चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा सगळ्यात सोपा वापरू शिकवला,
 • ज्याच्या जोरावर शेतकरी समृद्ध झाले, बे भरोशाच्या पावसाच गणित ओळखलं.

Unseasonal Rain Damage दोन लाख हेक्टरवरील पिकांची झाली माती

Shet Rasta Kayda: शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल, तर साधा अर्ज करील काम तमाम

Leave a Comment

error: Content is protected !!