Sheti Yojana 2023 :आवश्यक कागदपत्रे/योजनेतील सहभागी होण्यासाठी काय करावे

Sheti Yojana 2023 वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खाजगी पळक्षेत्र शेतावरील बांध तसेच क्षेत्र शेतकऱ्यांनी वनवृक्ष लागवड केल्यास हे उद्दिष्ट सहज साध्य होणार आहे.

उद्दिष्ट

  • शासनाने झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतलेले आहे.
  • 2018 मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
  • तसेच आता देखील शासनाने एक उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतामध्ये पड जमिनीमध्ये किंवा शेताच्या बांधावर झाडे लावली तर त्याने शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
  • शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिलेले आहे.
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वतःच्या जमिनीवर वृक्ष लागवड करू शकणार आहेत.
  • यासाठी शासन शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.
  • या योजनेबद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे.
Sheti Yojana 2023

मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी भाग घेऊ शकतात?

  • Sheti Yojana 2023 अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • विभक्त जाती
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
  • स्त्रीकर्ता असलेले कुटुंब
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी
  • या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे.

Sheti Yojana 2023 आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी जॉब कार्डधारक असावा.
  • विहित नमुन्यात ग्रामपंचायतकडे अर्ज करावा.
  • नावे जमीन असावी त्यानंतर सातबारा, ८ अ चा उतारा जोडलेला असावा.
  • जातीचे प्रमाणपत्र किंवा दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला.
  • मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्याबाबत संमतीपत्र जोडावे.
  • योजनेत लागवड करता येणारी झाडे व त्याच्या तीन वर्षाच्या खर्चाचा मापदंड वरील मापदंडात समाविष्ट बाबी
  • जमीन तयार करणे
  • खड्डे खोदणे
  • कुंपण करणे
  • माती व खत मिश्रणाचे खड्डे भरणे
  • रोपे कलमाची लागवड करणे
  • नांग्या भरणे
  • खते देणे
  • निंदनी पीक संरक्षण
  • पाणी देणे
  • इत्यादी.
  • गोष्टी करणे अनिवार्य आहे.
Jilha Parishad Bharti 2023

20 रूपयात 2 लाखाचा विमा

प्रस्ताव जमा करण्यासाठी

  • ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांकडे प्रस्ताव सादर करा.
  • जर ग्रामसेवकांवर विश्वास नसेल तर ग्रामसेवकाकडे न जाता पंचायत समितीला जाऊन याची माहिती घेतली तरीसुद्धा चालेल.
  • पंचायत समितीमध्ये हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदान मिळवण्यासाठी 90% तर जिराईज झाडांसाठी 75% जिवंत झाडाचे प्रमाण राखणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा
  • Sheti Yojana 2023 ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत नाव नोंदणी कृत जॉब कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
Jilha Parishad Bharti 2023

आता यांनाही एस.टी. मध्ये 50% पर्यंत सवलत

Sheti Yojana 2023 योजनेतील सहभागी होण्यासाठी काय करावे
  • ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
  • ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये हा अर्ज घेण्यात येईल.
  • ग्रामसभेने सदर लाभार्थी व काम करण्याचा अर्ज मंजूर केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वतः व गावातील इतर मजूर काम पूर्ण करतील.
  • योजनेतील कामगारांना मजुरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
  • योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशीच शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.

Child Aadhar Card 2023 :घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड

PM Vaya Vandana Yojana 2023 :पती-पत्नी या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकतात

Leave a Comment

error: Content is protected !!