Non-Agricultural Land अर्ज करण्याची पद्धत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी सात दिवसात तहसीलदारांना अर्ज पाठवतात. तहसीलदार अर्जाची पाहणी करतात आणि त्यानुसार पुढची प्रोसेस केली जाते.
तहसीलदार कोणत्या गोष्टीची पाहणी करतात
- जमिनी गाव पातळीवर शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज भरल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
- जी जमीन एन ए करायचे आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिक्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र घ्याव लागेल.
- तहसीलदार जमिनीचा मालक आहे का नाही हे तलाठ्याकडून चौकशी करून घेतात.
- तसेच तहसीलदार हे जमीन एन ए झाल्यानंतर पर्यावरणीय अडचणीत किंवा प्रकल्पाला धोका असणार नाही हे पाहतात.
- तहसीलदार ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराची ऑर्डर किंवा आदेश काढला जातो आणि तलाठी कार्यालयात जमीन जी एन ए अशी नोंद केली जाते.
- तर अशाप्रकारे एन ए ची प्रोसेस आहे.
- यामध्ये महत्त्वाची सूचना एनए झालेली जमिनीचा त्या कामासाठी उपयोग जर झाला नाही तर ती एनए म्हणून रद्द केली जाते.
- आणि भरलेली जी रक्कम म्हणजेच नजराना तो सरकारकडे जमा केला जातो त्यानंतर पैसे परत भेटत नाही.
Non-Agricultural Land कागदपत्रे
- जिल्हाअधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाचा पाच रुपयाचा स्टॅम्प,
- जमिनीचा सातबारा,
- आठ अ उतारा,
- उत्तराच्या चार झेरॉक्स,
- जमिनीचा फेरफार उतारा,
- महसूल विभागाकडे रेकॉर्ड,
- अधिकाऱ्याकडून जमिनीचे कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र,
- तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा लागेल,
नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?
- Non-Agricultural Land जर इमारतीसाठी एन ए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनचा 8 प्रतिही लागेल.
- जर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नसेल तर त्याची खातर जमा करण्यासाठी चालू सातबारा लागेल.
- जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलद गती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जलद गती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून नहारकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
- आणि ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते,
- जर शहरी भागात असाल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र गरजेचे असते,
- जर जमीन बॉम्बे वही वाट आणि शेती फायदा 1948 अंतर्गत असेल तर त्यासाठी परवानगी 43 63 नुसार मिळणे आवश्यक असते.
BBT Plus 399 Scheme :399 दिवसाच्या ह्या योजनेत फायदाच फायदा
Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज