Maharashtra Budget 2023 : पीक विमा बंद आता मिळणार शासनाचे अनुदान

Maharashtra Budget 2023 च्या बजेटमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणं 19 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगृह अनुदान योजना ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते.

परंतु याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे क्लेम आल्यानंतर सुद्धा विविध कागदपत्र किंवा इतर काही कारण सांगून हे क्लेम रिजेक्ट केले जातात. शेतकऱ्याचा अपघात होऊन त्यांचे अवयवाचा काही नुकसान होऊन किंवा मृत्यू होऊन सुद्धा त्या शेतकऱ्याला क्लेमची रक्कम मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेले होत्या.

Maharashtra Budget 2023

मान्यता केव्हा मिळाली

  • या अनुषंगाने 2023 च्या बजेटमध्ये एक महत्त्वाचे अशी घोषणा केली गेली होती ती म्हणजे शेतकऱ्यांचा जर मृत्यू झाला किंवा काही अपघात झाला तर दिले जाणारे जे अनुदान आहे जाणारी रक्कम आहे ते शासनाच्या माध्यमातून सहानुग्रह अनुदान म्हणून दिली जाईल.
  • यासाठी आता 19 एप्रिल 2023 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या ऐवजी आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगृह अनुदान योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांचा मृत्यू झाला अपघातामुळे काही अवयव निकामी झाले तर त्या शेतकऱ्याला दिले जाणारे रक्कम शासनाच्या माध्यमातून चालू ग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
  • एकंदरीतही योजना कशा प्रकारे राबवली जाणारे कोण लाभार्थी असतील हे सविस्तर अशी माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पात्रता

  • महाराष्ट्रात एकंदरीत असलेले खातेदारक वैद्यधारकांची संख्या आणि त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबातील एक कुठली व्यक्ती जिच्या नावावरती जमीन नाही असे विना खातेदारक व्यक्ती ही या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणार आहे.
  • ज्या व्यक्तीचे वय कमीत कमी 10 वर्षापासून 75 वर्षापर्यंत असेल अशा व्यक्तींना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

जमीन खरेदीसाठी 100% अनुदान

Maharashtra Budget 2023 कोणत्या मृत्यु वर मिळणार भरपाई

  • अपघात रस्ता रेल्वे अपघात
  • पाण्यात बुडून झालेला मृत्यू
  • जंतुनाशका हाताळताना किंवा अन्य कारणामुळे झालेली विषबाधा
  • विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
  • वीज पडून झालेला मृत्यू
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • याचप्रमाणे सर्पद अंश विंचुदोष
  • नक्षलाईट कडून झालेल्या हत्या
  • जनावराच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
  • बाळांतपणातील मृत्यू
  • दंगल
  • अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे

कोणत्या मृत्यु वर नाही मिळणार भरपाई

  • तसेच योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू
  • विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
  • आत्महत्याचा प्रयत्न
  • आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेणं
  • गुण्याच्या उद्देशाच्या कायद्याचे उल्लंघन करत असताना झालेला अपघात
  • आमले पदार्थाच्या अमलाखाले असताना झालेला अपघात
  • भ्रमिष्टपणा
  • शरीरांतर्गत रक्तदाब
  • मोटार शर्यतीतील अपघात
  • युद्ध
  • सैन्यातील नोकरी
  • आणि जवळच्या लाभधारकांकडून खून
  • या संबंधातील याच्यामध्ये समावेश असणार नाही

लिंक वर जाण्यासाठी क्लिक करा

किती मिळणार भरपाई
  • Maharashtra Budget 2023 आणि अशा प्रकारचे जर काही अपघात झाले तर अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपयांचा आर्थिक साह्य दिल्या जाणार आहे
  • अपघातामुळे दोन डोळे दोन हात दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये
  • अपघातामुळे एक डोळा एक हात एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये
  • अपघातामुळे एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामे होण्यामुळे जर काही अपघात झालेला असेल तर एक लाख रुपयांचे मदत यांच्यामध्ये दिली जाणार आहे.
  • यामध्ये वयक्तिक खातेदार म्हणून नोंद असलेला एक शेतकरी सदस्य आणि त्याच्याबरोबर आई वडील किंवा शेतकऱ्याची पती-पत्नी किंवा शेतकऱ्याची अविवाहित मुलगी यांचा या ठिकाणी समावेश करून एखाद्या धारकाला या योजनेच्या अंतर्गत सदस्य लाभार्थी म्हणून पात्र करण्यात येणार आहे.
वारसा हक्का नोंदवण्यासाठी लागणारे कागदपत्रे
  • सातबाराचा उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्याचा वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडून गाव नमुना नंबर सहा मधून मंजूर केलेली वारसाची नोंद
  • शेतकऱ्याच्या वयाचे पडताळणी करण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • यापैकी जे कागदपत्र असेल असे कागदपत्र प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील माहिती अहवाल याचप्रमाणे अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र खालील प्रमाणे असणार आहेत.
  • वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे कागदपत्रे लागणार आहे.
  • रस्ता रेल्वे अपघात
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, विमा संरक्षण व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
  • पाण्यामध्ये बुडून मृत्यू
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व शतिपूर्ती बंधन पत्र आवश्यक.
  • जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल.
  • वीज पडून मृत्यू
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल
  • खून
    • इन्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल, दोषारोप पत्र.
  • उंचीवरून पडून झालेला मृत्यू
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल.
  • सर्पदंश विंचू दंश
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्ट वैद्यकीय अहवाल, वैद्यकीय उपचार पूर्वीची निधन झाल्याने पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रति स्वाक्षरीत असणे आवश्यक.
  • नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या
    • इन्व्हेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, नक्षलवादी हत्या संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.

बैलगाडी अनुदान योजना

अटी
  • अपघात झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये जे काही वारसदार असतील आता याच्यामध्ये वारसदाराची व्याख्या सुद्धा देण्यात आलेली आहे.
  • ज्याच्यामध्ये
  • अपघातग्रस्ताची पत्नी अपघातग्रस्त स्त्रीचा पती
  • अपघातग्रस्ताचे अविवाहित मुलगी
  • अपघात ग्रस्ताचे आई
  • अपघातग्रस्त चा मुलगा
  • अपघातग्रस्ताचे वडील अपघातग्रस्ताचे सून
  • अन्य कायदेशीर जे काही वारस असतील ज्यांचे नोंद लागलेले असेल अशा वारसदारांना 30 दिवसाच्या आत मध्ये हा विविध नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह कार्यालय मध्ये सादर करायचा आहे.
Maharashtra Budget 2023 कार्यरत समित्या
  • यासाठी तालुकास्तरीय समिती ज्यामध्ये तहसीलदार अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांमध्ये अध्यक्ष अशा प्रकारच्या समित्या सुद्धा या ठिकाणी गठीत करण्यात आलेले आहेत.
  • यामध्ये राज्यस्तरीय समिती सुद्धा घटित करण्यात आलेली आहे आणि जर काही याच्या संदर्भातील दाद असेल तक्रारी असतील तर या समितीकडे दाद मागता येणार आहे.
  • अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण बदलासह 19 एप्रिल 2023 पासून राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगृह अनुदान योजना ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • ज्यामुळे आता शेतकऱ्यांना अपघात असतील अपघाती मृत्यू असतील किंवा अवयव निकामी होणं असेल या सर्वांसाठी या विमा कंपन्यांच्या पाठीमागे धावण्याच्या गरज लागणार नाही.
  • शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट हे सानुग्रह अनुदान म्हणून त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार आहे.
  • अशा प्रकारचा एक महत्त्वाचा बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

Fake Rupee Notes :कश्या ओळखायच्या 500 आणि 2000 नोटा

Leave a Comment

error: Content is protected !!