VanRakshak Mega Bharti वनविभागा मार्फत 9640 पदांची मेगा भरती करण्यात येणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही जर बारावी पास असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे.

किती पदांसाठी होणार भारती
- वित्तगृह आणि सामान्य प्रशासन विभागात शिंदे फडणवीस सरकारने मोठे भरती काढल्यानंतर आता वनविभागामध्ये सुद्धा तब्बल 9640 पदांची मेगा भरती होणार आहे.
- आणि याबाबतच्या शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि लवकरच जाहिरात सुद्धा येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
VanRakshak Mega Bharti थोडक्यात
- महाराष्ट्र वनविभाग भरती यावर्षी राज्य शासनाच्या वतीने अनुकंपा सह सर्व विभागातील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून त्यानंतर गत राज्यभरात वन विभागातील वनरक्षकांच्या 9640 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
- त्यापैकी 2071 जागा रिक्त आहेत.
- म्हणजेच 9640 पैकी 2071 ह्या जागा रिक्त जागा आहेत.
- शिवाय वनविभागाच्या कामाच्या विस्तार वाढल्यामुळे त्या तुलनेत वनरक्षकांची संख्या कमी पडत आहे.
- या वाढत्या कामाच्या बोजामुळे ६ हजार पेक्षा जास्त पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे.
- या वाढविलेल्या पदांच्या संख्येच्याही त्याच समावेश असेल त्यामुळे आता वनविभागात मेगा भरती होणार आहे.
- नेमक्या किती पदांवर भरती होणार आहे याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
विषय
- VanRakshak Mega Bharti वनविभागातील नामनिर्देशनच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड या संवर्गातील भरतीबाबत.
- GR मध्ये वनविभागातील गट ब क व ड वर्गातील पदे त्यांची यादी दिलेली आहे.
18000 पदांसाठी पोलिस भारती
- 18000 पदांची जम्बो पोलीस भरती झाली त्याचप्रमाणे आता वनविभागा मार्फत सुद्धा ही मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- वनरक्षक पदामध्ये समाज असेलच परंतु वनविभागातील गट क आणि गट ड वर्गातील पदांचा सदस्य यामध्ये समावेश असणार आहे.
- त्यामुळे ही सुद्धा एक मोठी जम्बो भरती असणार आहे.
- जे विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये अपात्र झाली असतील किंवा जे विद्यार्थ्यांना बारावी पास झाले असतील तर त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे.
- आता जी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये सर्वात आगोदर ग्राउंड घेण्यात आले होते.
- त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
- त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्राउंड मध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना लेखी परीक्षा देता आली नाही.
- त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
- तर अशा विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक भरती हा एक गोल्डन चान्स असणार आहे.

परिक्षा स्वरूप
- कारण वनरक्षक भरती मध्ये सर्वात आधी 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- आणि त्यानंतर ग्राउंड घेतली जाणार आहे.
- जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असतील तर त्यांनी आता लवकरात लवकर अभ्यासाला लागा.
- एक संधी गेली असती तरी दुसरी संधी तुमच्यापुढे आहे आणि ही संधी हातातून जाऊ द्यायची नाहीये.
12 thoughts on “VanRakshak Mega Bharti :वनरक्षक भरती 2023”