Farmers Suicides मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकन्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले.
तीन महिन्यांत २१४ आत्महत्या : सावकारी कर्जाचा जाच, अवकाळीमुळे हतबलता
- खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली.
- कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही.
- सोयाबीनने फटका दिला.
- यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात असून, गेल्या ९० दिवसांत विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
- रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या विभागात होत असल्याचे प्रमाण आहे.
- जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
- बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ आत्महत्या झाल्या.
- सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते.
- विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही.
- त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज घेणाऱ्या सावकारांकडे हात पसरावे लागतात.
- विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना.
- सावकारी कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मानसिक ताणासह इतर अनेक नैराश्यांचा सामना शेतकरी करीत आहेत.
- शेतकऱ्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सहा पानी प्रश्नावलींतून सर्व्हे करण्यात येणार आहे.
- सर्व्हेच्या विश्लेषणाअंती उपाययोजनांव प्रशासन तज्ज्ञांशी चर्चा करून जाणार आहे.
- या सव्र्हेच्या अनुषंगाने विभागी आयुक्त सुनील केंद्रेकर यां जिल्ह्यातील दीड हजारांव कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
- चार वर्षांपासून अतिवृष्टी
- मराठवाड्यात चार वर्षापासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकयांच्या हातून गेले.
- ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे.
- भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.
अजून माहितीसाठी येथे क्लिक करा
बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
- बीड जिल्ह्यात गेल्या ९० दिवसांत ६५ शेतकयांनी मृत्यूला कवटाळले.
- त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ४३ शेतकऱ्यांन आत्महत्या केल्या.
Farmers Suicides आता प्रशासन करणार सर्व्हे…
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक मानसिक, कौटुंबिक स्थितीची आगामी काळात उकल व्हावी, यासाठी ग्रामविकास, कृषी आणि महसूल प्रशासन सर्वेक्षण करणार आहे.
नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर | 23 |
जालना | 15 |
परभणी | 18 |
हिंगोली | 05 |
नांदेड | 31 |
बीड | 65 |
लातूर | 14 |
धाराशिव | 43 |
एकूण | 214 |
Apply Kusum Yojana Online :कुसुम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती