How To Remove Illegal Possession From Property :प्रॉपर्टी मधील अवैध कब्जा कसा काढावा

Remove Illegal Possession जर कोणी व्यक्तीचे कलम सहा अन्वये सहा महिन्याच्या आत कोर्टात दावा दाखल करू शकला नसेल तर त्या व्यक्तीस सामान्य दावा कोर्टात दाखल करावा लागतो. असे सामान्य दिवाणी दाव्यात वेळ जास्त लागतो आणि अडचण देखील जास्त असतात. त्या दाव्याच्या निकाला विरुद्ध अपील रिविव्ह इत्यादी प्रक्रिया वरिष्ठ कोर्टात होऊ शकतात.

कोणत्या कायद्यान्वये दावा दाखल करू शकतो.

 • Remove Illegal Possession स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम 6 बद्दल माहिती घेणार आहोत जी संपत्ती खरेदी केली आहे त्या संपत्तीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
 • कोणी व्यक्तीने एखादा प्लॉट खरेदी केला फेरफार ने सातबारा सदरील नोंद देखील झाली आता तो निश्चिंत होऊन पुन्हा त्याचे कामाच्या ठिकाणी शहराकडे निघून गेला.
 • त्यानंतर पुढच्या दिवाळीच्या सुट्टीत घरी परत आला की कळाले की कोणी एखाद्या गुंडाने त्याच्या खरेदीच्या जागेत अवैधरित्या कब्जा केलेला आहे.
 • आणि आता तो त्या जागेतून निघून जाण्यास तयार नाही.
 • हे लक्षात घेतले पाहिजे की जर हा व्यक्ती आपल्या खरेदीच्या मिळकतीला तार कंपाऊंड किंवा भिंतीचे कंपाउंड बांधून गेला असता तर त्या मिळकतीवर कोणाची नजर पडली नसती आणि कोणी अवैधरित्या ताबा केला नसता.
 • या व्यक्तीने कोर्टात कोणत्या कायद्यांतर्गत दाद मागावी किंवा काय कायदेशीर प्रक्रिया अवलंब व्हावे हे पाहूयात.
 • स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम 6 या कलमामध्ये असे नमूद आहे
 • जर एखाद्या व्यक्तीपासून त्याचा शांततामय कब्जा काढून घेतला गेला असेल
Jilha Parishad Bharti 2023

फसवणूक करून घेतलेले हक्कसोडपत्र कसे रद्द करावा

Remove Illegal Possession

 • तर अशा व्यक्तीने त्याला ताब्यामधून बे दाखल केल्यापासून सहा महिन्यांच्या आत स्पेसिफिक रिलिफिकचे कलम 6 अन्वये दिवाणी न्यायालयात दावा दाखल करायचा असतो.
 • हे आवश्यक नाही की असा दावा मालकानेच करावा
 • असा दावा कोणीही व्यक्ती की जिचा कब्जा आहे अशा व्यक्तीने केला तरी चालतो.
 • अशा व्यक्तीचा कब्जा हा भाडेपट्ट्याने असू शकतो लायसन्सच्या नात्याने असू शकतो किंवा कुलमुखत्यार पत्राच्या आधारे देखील असू शकतो.
 • ज्याचा ताबा होता त्या व्यक्तीचा ताबा कोणत्याही अधिकारात असेल तरी तो असा दावा दाखल करू शकतो.
 • दाव्याची सुनावणी न्यायालयाने संक्षिप्त प्रकारे घ्यायचे असते म्हणजे जसे अन्नदावे कोर्टात प्रलंबित असतात अशा प्रकारे हा दावा वर्षानुवर्षे चालणारा नसतो.
 • या कलमा बद्दल सर्वात महत्त्वाची आणि चांगली तरतूद ही आहे
 • की या कलमांतर्गत झालेल्या निकाला विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागता येत नाही.
 • या कलमांतर्गत झालेल्या निकाला विरुद्ध अपील करता येत नाही तसेच रिव्ह्यू रिविजन अर्ज वरिष्ठ कोर्टात दाखल करता येणार नाहीत.
 • परंतु या कलमांतर्गत दावा दाखल करताना काही गोष्टींचे पालन करावे लागते.
Jilha Parishad Bharti 2023

शेतजमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळतय अनुदान

कोण कोणत्या गोष्टींची पालन करावे

 • दावा सरकार विरुद्ध करता येणार नाही
 • म्हणजेच जर सरकारने प्रॉपर्टी मधून बेदखल केले तर त्याविरुद्ध हा दावा दाखल करता येणार नाही.
 • याचा अर्थ असा नाही की सरकार द्वारे प्रॉपर्टी मधून बेधखल केले तर त्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही.
 • अन्य तरतुदी आणि कलमांतर्गत दावा दाखल करू शकता
 • सामान्य दिवाणी दावा सरकारवर दाखल करू शकता आणि प्रॉपर्टी सरकारकडून परत घेऊ पण शकतो.

Tax Deducted at Source :पेमेंट मधून कटणारे टीडीएस म्हणजे नेमक काय?

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2023 :आता मागेल त्याला काम नव्हे तर हवे ते काम मिळणार

Leave a Comment

error: Content is protected !!