Onion Rate CrashDown :उन्हाळी कांद्याला अवकाळीचा फटका

Onion Rate CrashDown एप्रिल आणि मे महिन्यात राज्याच्या अनेक भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी कांद्याला फटका बसला आहे. पावसामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च भरून येणेही कठीण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Onion Rate CrashDown

लागवडीचा खर्चही भागत नसल्याने शेतकरी हवालदिल

 • लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची प्रतवारी चांगली मानली जाते. शेतकरी आणि व्यापारी वर्षभराच्या साठवणुकीसाठी
 • उन्हाळी कांद्याला प्राधान्य देतात. कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी कांद्याची लागवड पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, मंचर, खेड, नारायणगाव भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
 • नाशिक, तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदा भागात उन्हाळी कांद्याची लागवड होते.
 • मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्यात ओलसरपणा आहे. त्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे.
 • बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून साधारणपणे दररोज ६० ते ७० ट्रक कांदा मार्केट यार्डातील घाऊक बाजारात येत आहे.
 • मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यामुळेही कांद्याला भाव नाहीत.
 • घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला प्रतवारीनुसार ५० ते ९० रुपये भाव मिळाला आहे.
 • किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री २० ते २५ रुपये दराने केली जात आहे.
 • लागवड, वाहतूक आणि बाजार खर्च विचारात घेता शेतकऱ्यांना कांदा विक्रीस पाठवणे परवडत नाही.
 • गेली तीन ते चार वर्षे कांद्याला भाव मिळत नसल्याचे निरीक्षण श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी नोंदविले.
Jilha Parishad Bharti 2023

शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयेचा हप्ता होणार या दिवशी जमा

Onion Rate CrashDown शेतकऱ्याच्या हातात मुद्दलही येईना

 • Onion Rate CrashDown कांदा लागवडीचा एकरी खर्च ५० हजार रुपये येतो.
 • एका एकरातून आठ ते दहा टन उत्पादन मिळते. सध्या घाऊक बाजारात एक किलो कांद्याला सात ते आठ रुपये भाव मिळत आहे.
 • एवढा कमी भाव शेतकऱ्यांना परवडत नाही.
 • गेली तीन ते चार वर्षे कांद्याला भाव नाही. त्यातच अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे.
 • अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीस जागा नाही. कांदा शेतात खराब होण्यापेक्षा शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्रीस प्राधान्य देतात.

Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू

Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल

Leave a Comment

error: Content is protected !!