Property Rights 2005 च्या दुरुस्तीने प्रत्येक स्त्रीला त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार आणि हक्क दिला आहे समान अधिकार म्हणजे त्या संपत्तीमध्ये जे वाटप होते त्यामध्ये मुलाला जेवढा हिस्सा येतो तेवढा त्या मुलीला देखील मिळतो.
पत्नीला पतीच्या मिळकतीमध्ये काय अधिकार असतो?
- लग्नानंतर स्त्रीला तिच्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं त्याच ठिकाणी राहावं लागते.
- पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.
- अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्ती मध्ये किती अधिकार आहे याची जाणीव त्या महिलेला असणं आवश्यक आहे.
- मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत भारतीय उत्तराधिकार कायदा,
- हिंदू, मुस्लिम वयक्तिक कायद्यामध्ये उत्तर अधिकाराचे नियम लागू केलेले आहेत.
- कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता दोन प्रकारची असते.
- 1) स्वतः मिळवलेली मालमत्ता
- ज्या स्त्रीने विशिष्ट मालमत्ता मिळवलेल्या व्यक्तीशी विवाह केला आहे तिला त्या व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे की नाही हे प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
- हे स्पष्ट आहे की जेव्हा कोणतही व्यक्ती स्वतः कोणतही मालमत्ता घेतो तेव्हा त्या व्यक्तीचा मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो.
- मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकतो मग त्याची मालमत्ता स्थावर असू द्या किंवा ते जंगम असू द्या.
- कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि इतर कोणीही त्याच्या अधिकारात घुसखोरी करू शकत नाही.
- 2) वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता
- वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेत पत्नीचा तेव्हढाच हक्का असतो जेव्हढा पतीचा आहे.
पतीच्या मालमत्तेवर महिलांचा अधिकार असेल की नाही
- Property Rights मालमत्ता स्वतः अधिग्रहित केली असल्यास तरच त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्याचाच अधिकार असेल ते मालमत्ता विकू शकतो दान करू शकतो किंवा मृत्युपत्रांमध्येही जोडू शकतो.
- पत्नीला पती जिवंत असताना मालमत्तेमध्ये अधिकार नाही विवाहित स्त्रीला तिचा पती जिवंत असेपर्यंत तिच्या पतीने मिळवलेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो.
- पतीच्या हयातीमध्ये पत्नीला संपत्तीवर कोणताही अधिकार नाही.
- तिच्या पतीच्या मृत्यूनंतरही तिच्या पतीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला मृत्युपत्रांमध्ये दिली तर त्या मृत्युपत्राच्या वारसाला मालमत्तेमध्ये हक्क असेल आणि पत्नीला मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही.
- लग्नाच्या वेळी अनेक स्त्रियांचा असा समज होतो की पुरुषशी लग्न केल्यानंतर त्या महिलेने मिळवलेली संपत्ती ही त्या महिलेचा हक्क बंदी आहे पण हे योग्य नाही.
- त्या महिलेला मालमत्तेत हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा ती सहमालक म्हणून मालमत्तेमध्ये जोडली जाईल.
- उदाहरणार्थ: जर एखाद्या शेत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल आणि एखाद्या महिलेने त्या व्यक्तीशी लग्न केल असेल तर त्या व्यक्तीच्या नावावर शेताची मालक म्हणून पत्नीचे नाव देखील जोडायचे आहे असे नाव देणगी पत्राद्वारे जोडले जाऊ शकते.
- म्हणजे पती म्हणू शकतो की त्याने आपल्या पत्नीचे नावे अरबीस्त संपत्ती केलेली आहे.
- नंतर त्याच्या पत्नीला त्या मालमत्तेमध्ये सहभागी मिळते पण देणगी शिवाय स्त्रीला कोणताही अधिकार राहत नाही.
- स्त्रीला तिच्या पती कडून फक्त पोटगीची रक्कम मिळते.
नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?
Property Rights सासू-सासर्यांच्या मालमत्तेवर हक्क
- विवाहित महिलेला सासूच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही.
- जोपर्यंत सासू-सासरे जिवंत आहे तोपर्यंत स्त्री कोणताही दावा करू शकत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही स्त्री कोणताही दावा करू शकत नाही.
- अशावेळी महिलेचा पती हा मालीमतेचा वाटेकरी असतो पण जर पती आधीच मरण पावला असेल आणि नंतर सासरच्या मंडळींचा मृत्यू झाला असेल तर पत्नीला वारसा हक्क मिळतो.
- नंतर मृथम व्यक्तीच्या विद्येला तिच्यासह तिच्या सासरच्या मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त होतो पण हे केव्हा शक्य असते.
- जेव्हा त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेच्या संदर्भात कोणतीही मृत्युपत्र केले नसेल
मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा हक्क काय असतो
- Property Rights जेव्हा एखाद्या महिलेचा पती मृत्युपत्राशिवाय स्वतःची संपत्ती सोडून मरण पावतो.
- अशा स्थितीमध्ये त्याच्या मालमत्तेवर तिची पत्नी त्याची आई आणि त्याच्या मुलांचाही हक्क असतो.
- येथे उत्तर अधिकाराच्या बाबतीत हिंदू उत्तर अधिकार कायदा 1956 चे नियम
- आणि मुस्लिमांच्या बाबतीत लागू असलेले मुस्लिम वयक्तिक कायदा लागू आहे.
आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात
मालमत्तेचा वारसा या कायद्याच्या नियमानुसार ठरवला जातो.
- एखादा हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या घराची किंमत एक लाख रुपये आई भाऊ बहीण आणि विधवा पत्नी यांना सोडून तो माणूस मरण पावला या प्रकरणांमध्ये त्या व्यक्तीने घेतलेल्या मालमत्तेत त्याच्या भावाचा आणि बहिणीचा कोणताही हक्क राहणार नाही.
- पण त्याची विधवा पत्नी आणि त्याची आई या दोघांनाही मालमत्तेमध्ये समान हक्क असेल.
- हिंदू उत्तर अधिकार कायद्यांतर्गत हा उल्लेख आढळतो जिथे मृत्युपत्र न बनवता हिंदू व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना मालमत्तेचा वारसा देण्याच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे.
- या गोष्टींवरून कोणत्याही विवाहित महिलेचा तिचा नवरा आणि सासरच्या लोकांच्या मालमत्तेवर ती जिवंत असताना कोणताही हक्क नाही.
- पण ती व्यक्ती मरण पावली किंवा मृत्युपत्राशिवाय मरण पावली तेव्हा स्त्री तिच्या पतीच्या मालमत्तेमध्ये तिच्या वारसा साठी दावा करू शकते.
- पती जिवंत असताना तिला कोणताही अधिकार नाही पत्नी केवळ स्वतःसाठी पोटगीचा दावा करू शकते.
- त्याशिवाय ती तिच्या पतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही.
- परंतु संपत्ती घेताना पैसे पत्नीने दिले असतील आणि त्या पैशाने पतीने स्वतःच्या नावाने मिळकत खरेदी केली असेल तर
- अशा परिस्थितीमध्ये त्या पत्नीला कोर्टात जावे लागेल आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे लागेल किती मिळकत खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसे दिलेले आहे.
- त्यावेळेस कोर्ट पत्नीला त्या मिळकतीमध्ये अधिकार देतो.
- जर एखादी मिळकत पती आणि पत्नी द्वारे एकत्रित खरेदी केली गेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये दोघेही ठरवलेले हिस्स्याचे मालक असतात.
Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज
Mahila Bachat Gat 2023 :महिला बचतगट अटकताय मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात