Inflaction Of Essential Commodities :अगोदरच महंगाई चा डंका … आता दुधानेही वटारले डोळे

Inflaction Of Essential Commodities दुधाची मागणी ८ ते १०% वाढली आहे. सध्या देशात दुधाचा पुरवठा 7 सुरळीत आहे. स्किम्ड दूध पावडरचाही पुरेसा साठा आहे. मात्र, लोणी व तुपाचा साठा घटला आहे. त्यामुळे गरज भासल्यास त्यांची आयात करण्याबाबत विचार करू असे केंद्रीय पशुसंवर्धन व डेअरी सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.

Inflaction Of Essential Commodities

दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य, आवश्यक खाद्यान्नांच्याही किमती वाढल्या

  • गेल्या वर्षभरात डाळ, तांदूळ, गव्हाचे पीठ, खाद्यतेलासह आता दूध, दही, पनीर, तूप इत्यादींचेही भाव वाढले आहेत.
  • जवळपास प्रत्येक वस्तू १० ते १५ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.
  • दुधाच्या मागणीत वाढ झाली असून, त्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे.
  • त्यामुळे यंदा उन्हाळ्यात दुधाचे दर आणखी वाढू शकतात.
  • दुग्धजन्य पदार्थाची मागणी व किमतींवर सरकार लक्ष ठेवून आहे.
  • गरज भासल्यास या पदार्थाची आयात करण्याचा सरकारचा विचार आहे.
  • तसे झाल्यास वर्षामध्ये प्रथमच डेअरी उत्पादनांची आयात ठरणार आहे.

५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत

खाद्यतेल उतरले, पण डाळी भडकल्या

  • Inflaction Of Essential Commodities मागील दोन वर्षांत खाद्यतेलाचे दर प्रचंड वाढले होते.
  • मात्र, आता करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले.
  • अन् तीन महिन्यांत अन्य खाद्यतेलांचे भाव २५ रुपयांपर्यंत घटले.
  • पण याच वेळी डाळींचे भाव मात्र वधारले आहेत.
  • आता काय नुसते खाद्यतेलच प्यायचे का, असा सवाल ग्राहक विचारत आहेत.
  • गेल्या तीन महिन्यांत तेलाचे भाव २५ ते ५० रुपये लिटरमागे कमी झाले.
  • अन्य खाद्यतेलांचे भावही २० ते २५ रुपयांनी घटले.
  • मात्र, विविध कारणांनी उत्पादन घटल्यामुळे डाळींचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.

Inflaction Of Essential Commodities दूध पुरवठ्यावर सरकारचे लक्ष

  • यंदा उन्हाळ्यापूर्वी मागणी आणि पुरवठ्यात तफावत जाणवत आहे.
  • त्यामुळे अनेक डेअरी संघांनी दुधाच्या उत्पादनांची आयात करण्याची मागणी केली आहे.
  • आम्ही याकडे लक्ष ठेवून आहोत, असे सरकारने म्हटले आहे.
  • २२.१ कोटी टन दुधाचे उत्पादन २०२१-२२ या वर्षात झाले.

२२ खाद्यपदार्थांच्या किमती

वस्तु202020212022
तांदूळ34..2535.9837.3
गहू28.3627.2530.15
गव्हाचे पीठ30.8130.7534.50
चणा डाळ68.5975.2673.66
उडीद डाळ101.80103.90102.60
मूग डाळ103.50103.90102.60
मसूर डाळ७४.७४१०३.९०९६.२१
शेंगदाणा तेल१४७८८.७५१८९
मोहरी तेल१२३.३० १७६.३०१८२
वनस्पती तेल९२.२७१७०.७०१५०.२०
सोयाबीन तेल१०२.८०१३११५८.४०
सूर्यफूल तेल११४.२०१४७.३०१७८.२०
पामतेल९२. १४१६४.४०१३४.८०
बटाटा३१.२५२१.३४२५.२०
कांदा३५.८८३२.५२२८.००
टोमॅटो३३.६६३२.६३३६.६९
साखर३९.८५४०.६२४१.८७
गूळ४७.८९ ४७.६८४९.३९
दूध (प्रतिलिटर)४६.५२४९.११५२.८१
चहा (सुटा)२२४.७०२७९.८०२८२.५०
मीठ१६.२७१८.०९२०.२५

Ration Card Update :तुमचे रेशन कार्ड रद्द होणार आहे का? आताच करा चेक

Cotton Update :कापसाचा भाव ८३०० च्या पार

Leave a Comment

error: Content is protected !!