Ration Card Changes :बँकमध्ये पैसे जमा होण्यास सुरू

Ration Card Changes राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील पात्र एपीएल शिधा पत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे अशा पात्र शिधापत्रक धारकांचे बँक खाते क्रमांकशी लिंक करण्याच्या कामास प्राधान्य द्यावे असे आदेश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. शिधापत्रकांना आधार क्रमांक लिंक करण्याची कारवाई गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा

  • लातूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभाग स्तरीय बैठकीत श्री चव्हाण बोलत होते.
  • औरंगाबाद विभागीय आयुक्त म्हणजे छत्रपती संभाजी नगर आयुक्त कार्यालयातील पुरवठा उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांच्यासह विविध जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यावेळी उपस्थित होते.
  • ही बैठक लातूर येथे असली तरी यामध्ये सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
Jilha Parishad Bharti 2023

तुमचे नाव आले का यादीत

  • राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल सिद्धा पत्रक धारक शेतकरी कुटुंबयांना अर्थसंकल्पीय घोषणेनुसार प्रति लाभार्थी 1800 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे.
  • डीबीटी द्वारे ही रक्कम शिधापत्रक धारकाच्या थेट बँक खात्यात जमा होईल.
  • याकरिता सर्व पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक तातडीने लिंक करून आवश्यक कारवाई पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे.
  • सर्व पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित होण्यासाठी शिधापत्रकांना आधार क्रमांक लिंक करण्याची कारवाई लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.
  • त्यामुळे अद्याप आधार क्रमांक लिंक न केलेल्या शिधापत्रक आधार लिंक करण्याचे काम गतीने करावे असे श्री चव्हाण यांनी सांगितल आहे.
  • राशन कार्ड असेल त्या राशन कार्डला आधार शेडिंग करून घेण गरजेचे आहे ती आधार शेडिंग जे शिधा धारक कोठेधारक आहे.
Jilha Parishad Bharti 2023

आताच पाहा यादी

Ration Card Changes 2023

  • त्या कोठेधारकाकडे आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या
  • त्यानंतर बँक खात्याला आधार कार्ड आधार कार्ड लिंक असने आवश्यक आहे.
  • जोपर्यंत बँकाला आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत हे पैसे खात्यावर येणार नाही.
  • आता अनेक लाभार्थ्यांचे हे सर्व प्रक्रिया कम्प्लिट झाले आहे.
  • त्यांचे पैसे आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर येणारे आहे.
  • या बैठकीच्या स्थानी औरंगाबाद विभागातील एकूण शिधापत्रक धारक असेल गोदामाची संख्या असेल शिवभोजन योजना धान्याची उचल व वाटप आनंदाचा शिधा वितरण आधी बाबीचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी आढावा घेतला आहे.
  • यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याच्या सविस्तर माहितीचा जीआर शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
  • तो जीआर पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल

Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग

Leave a Comment

error: Content is protected !!