POCRA Yojana Maharashtra :शेतीला वरदान ठरणारी योजना

POCRA Yojana Maharashtra नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अंतर्गत पोखरा ही योजना येते. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे पोखरा योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या योजना समाविष्ट आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत. ही योजना गरजू शेतकऱ्यांना व या योजनेसाठी पात्र असलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

पोखरा योजनेअंतर्गत यामध्ये 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.

  • जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, लातूर, अमरावती
  • या प्रकल्पामध्ये साधारणपणे 155 ते 156 या तालुक्यांचा समावेश आहे.
  • साधारणतः 3755 ग्रामपंचायती या योजनेमध्ये येतात.
  • या योजनेचा लाभ साधारणपणे १७ लाख शेतकऱ्यांना होतो.
  • भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे.

POCRA Yojana Maharashtra योजनेमद्धे अनेक अनुदान उपलब्ध

  • नानाजी देशमुख यांनी कृषी विभागांमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेले आहे.
  • जर एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याला पाण्यासाठी विहिरीची योजना दिली जाते.
  • जर तो शेतकरी इच्छुक असेल की त्याला शेततळ करायचं आहे जेणेकरून तिन्ही हंगामामध्ये त्याला शेतकऱ्याला पीक घेता येईल अश्या शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना आहे.
  • साठवलेले पाणी शेतात न्यायचं असेल तर त्यासाठी लागणारी पाईपलाइन यासाठीची ही योजना यामध्ये आहे.
  • पाणी वाचवण्यासाठी जे तुषार सिंचन व ठिबक सिंचन असते ते सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळू शकते.
  • या प्रकल्पातून सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो.
  • जसे की शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे बाजार कमी असतानाही ते उत्पादन विकावं लागतं त्यासाठी या योजनेमार्फत गोडाऊनची ही सुविधा योजना देते.

ही शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे.

  • पोखरा योजना महाराष्ट्र योजनेसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे.
  • या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समितीची सरचना असे आहे.
  • या समितीमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रगत शेतकरी अनुसूचित जातीतील एक सदस्य महिला बचत गट प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्या समितीमध्ये असतात.
  • तसेच कार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्यक ग्रामसेवक इत्यादी अधिकारी यामध्ये समाविष्ट असतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे कार्यपद्धती करावी
  • www.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने यामध्ये नोंदणी करून यासाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

  • अर्ज दाराचा ७/१२
  • ८अ चा उतारा
  • अर्जदार अनुसूचित जातीतील असल्यास त्याचा पुरावा
  • अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा
POCRA Yojana Maharashtraपोखरा योजनेमधील घटक.
  • हवामान अनुकूल कृषी परिस्थितीत प्रस्थान अनुदान देणे यामध्ये 100% अनुदान दिले जाते.
  • हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • जमिनीमध्ये गर्भ ग्रहणाचे प्रमाण वाढवी यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन खारपाणीग्रस्त गावे संरक्षण शेती यामध्ये शंभर टक्के व काही ठिकाणी 50 टक्के अनु दान दिले जाते.
  • एकात्मिक शेती पद्धती यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  • जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  • पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  • पाणी साठवण संरचनाची निर्मिती यामध्ये शंभर टक्के व काही ठिकाणी 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • सूक्ष्म सिंचन यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • काढणीपलक्षात व्यवस्थापन व हवामान अनुकूलन मूल्य साखळी प्रोत्साहन यामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रोत्साहन देणे.यामध्ये शेतकरी गटासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • व भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र सुविधा निर्मितीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • शेतमाल वृध्दी साठी हवामान अनुकूल उद्यानमुख मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  • हवामान अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी त्यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.pokhar yojana maharashtra

Kusum Solar Yojana कुसुम सोलर पंप नविन अपडेट

kanda anudan ३५०रु. कांदा अनुदान तर मिळल पण तुम्ही नियम व अटी बगीतल्या का?

Leave a Comment

error: Content is protected !!