Farming Tips :फायद्याची शेती, क्विंटल ला एक लाख रुपये भाव

Farming Tips कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपरफूड मानले जाते. हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे.

Farming Tips

जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग

 • महेंद्र अजीनाथ बारस्कर (रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे या ३९ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे.
 • बारस्कर यांचे शिक्षण दहावी नापास आहे. त्यांनी लावलेल्या पिकाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे.

औषधी वनस्पती प्रकारातील चिंया या पिकाला प्रतिकिलो एक हजार रुपये भाव मिळतो.

 • भारतात उच्चांकी दर मिळणाऱ्या या पीक लागवडीचा त्यांनी प्रयोग यशस्वी केला आहे.
 • हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पिकाची लागवड केली जाते.
 • रक्तदाब, वजन कमी करणे, मधुमेह, हाडे मजबूत आदी आरोग्यदायी जीवनासाठी चियाचा उपयोग होतो.
 • लागवडीपासून १२० दिवसांत हे पीक तोडणीसाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे हे पीक आहे.
 • लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त आहे.
 • कमी पाण्यात अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहते.
 • या पिकाची एकरी पाच क्विंटल उत्पादन क्षमता आहे.
 • मात्र, बारस्कर यांनी सेंद्रिय आणि शेणखताच्या वापरामुळे एकरी १० क्विंटल उत्पादन काढले आहे.

अजून माहितीसाठी येथे क्लिक करा

Farming Tips वनस्पतीचे फायदे

 • Farming Tips उग्र वासामुळे जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत
 • नाहीत. या पिकाला कोणत्याही रासायनिक खताची अथवा फवारणीची गरज नाही. हे पीक कोणत्याही
 • रोगाला बळी पडत नाही. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया
 • पाण्यात भिजवून सकाळी हे खाल्ल्यास याचा फायदा होतो.

Mahavitaran Update :वेळेत लाइट आली नाही, तर महावितरणकडून घ्या पाचशे रुपये

Government Permanent Jobs Bharti :सरकारी पेरमानेन्ट नोकरीसाठी भारती

Leave a Comment

error: Content is protected !!