New Small Saving Scheme :ही योजना देईल महिलांना 7.5% व्याज

New Small Saving Scheme एक महत्त्वाची सूचना जर तुम्हाला कुठल्याही अनोळखी नंबर वरून फोन आला व त्यांनी सांगितले. तुमच्या पोस्टातील खाते हे आज बंद होणार आहे आणि याचे कारण तुमची केवायसी अपडेट नाही म्हणून सस्पेंड करण्यात आली आहे तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका
 • जर त्यांनी काही लिंक पाठवलेले असतील तर त्यावरही क्लिक करू नका.
 • हे असे कॉल फ्रॉड असू शकतात खर पाहिला गेले तर पोस्ट ऑफिस मधून असे कुठलेही कॉल तुम्हाला केले जात नाही.
 • केवायसी अपडेट नसेल किंवा सस्पेंड झाले असेल तर त्याचा एक टेक्स्ट मेसेज तुम्हाला येऊ शकतो.
 • जर तसे काही झाले आहे किंवा नाही याची जर तुम्हाला खात्री करायची असेल.
 • तर तुम्ही अवश्य जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्याची चौकशी करू शकता.
 • त्यामुळे केवायसी ची गरज असेल तर पोस्टातील कर्मचारी हे तुमची केवायसी तुमच्या बायोमेट्रिकने म्हणजे तुमच्या हातांच्या ठसाने कंप्लिट करतील.
New Small Saving Scheme

नवी योजना नवे व्याजदर

 • एक फेब्रुवारी 2023 च्या बजेटमध्ये खास महिलांकरिता एक स्मॉल सेविंग स्कीमची अनाउन्समेंट झालेली आहे.
 • महिला सन्मान बचत पत्र म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट जर तुमच्या, घरातील महिलांच्या नावे किंवा लहान मुलींच्या नावाने तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते.
 • कारण या योजनेअंतर्गत महिलाना स्वतःच्या नावाने किंवा लहान मुली असतील तर त्यांच्या पालकांना देखील खाते उघडता येते.

आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा

या योजनेत किती गुंतवणीक करता येते

 • या योजनेअंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये आणि एक हजार रुपयांच्या पटीमध्ये तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते.
 • या योजनेअंतर्गत जास्तीच्या गुंतवणुकीची मर्यादा ही दोन लाख रुपये आहे.
 • म्हणजे योजनेमधील सर्व खाते मिळून एकत्रित रक्कम ही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
 • याचा अर्थ तुम्हाला या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या रकमेसाठी वेगवेगळे खाते उघडता येते.
 • परंतु या ठिकाणी एक अट दिलेली आहे म्हणजे
 • पहिले खाते तुम्ही उघडले असेल आणि दुसरेही खाते तुम्हाला उघडायचे असेल तर या दोन्ही खात्यांमध्ये कमीत कमी तीन महिन्यांचा अंतर असणे गरजेचे आहे.
 • खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला काही रक्कम काढायचे असेल.
 • तर त्यावेळी तुम्हाला पात्र शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत रक्कम परत करता येते.
 • या योजनेचा कालावधी हा फक्त दोन वर्षांचा आहे ज्यामुळे खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील दोन वर्षे पूर्ण होतात.
 • तुम्ही जमा केलेले रक्कम आणि त्यावर जनरेट झालेले व्याज एकत्रितपणे तुम्हाला परत केले जाते.

New Small Saving Scheme व्याज किती मिळते

 • महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत ७.५ टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो.
 • हा व्याजदर इतर कुठल्याही फिक्स डिपॉझिट पेक्षा अधिक आहे.
 • या इंटरेस्ट रेट नुसार व्याज हे दर तीन महिन्याला कंपाउंड केले जातात म्हणजेच चक्रवाढ करून तुमच्या खात्यावर जमा केले जाते.
 • ज्यावेळी खाते मॅच्युअर होते त्यावेळी ती सर्व रक्कम तुम्हाला परत केली जाते.

अकाउंट उघडण्याची पद्धत

 • New Small Saving Scheme अकाउंट ओपनिंग संदर्भात पोस्ट ऑफिसने एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे.
 • ती म्हणजे जर खाते योजनेच्या नियमांचे पालन न करता उघडण्यात आले असेल
 • किंवा त्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेल्या तर त्या रकमेवर पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंट चे व्याजदर लागू होते.
 • त्यामुळे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत असलेले 7.5% दराने व्याज हवे असेल तर योजनेच्या नियमांचे पालन करूनच खाते उघडा.
 • योजनेचा कालावधी हा कमी आहे परंतु या दोन वर्षात किंवा दोन वर्षात पूर्णहोण्या अगोदरच काहीही कारणास्तव तुम्हाला जर योजनेतून बाहेर पडायचे असेल आणि तुमचे पैसे परत हवे असतील.
 • तर त्यासाठी काहीच स्पेसिफिक नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
 • महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल
 • तर ते तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये कुठल्याही किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडते येते.

आताच करा अर्ज

खाते बंद कसे करू शकतात
 • जर खाते धरकाचा मृत्यू झाला तर त्यावेळी खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
 • जर जीव घेणा आजार खातेदाराला झाला असेल तसेच जर खातेदार मायनर असेल म्हणजे मुली लहान असतील व त्यांच्या नावाने त्यांच्या पालकांनी खाद्य उघडलं असेल
 • परंतु त्या पालकांचा मृत्यू झाला असेल तर अशावेळी योग्य कागदपत्रांचे सबमिशन करून तुम्हाला खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
 • खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यानंतर कुठलेही कारण न देता तुम्ही खाते बंद करणार असाल
 • तर अशा परिस्थितीमध्ये जो काही व्याजदर योजनेमध्ये लागू असतो त्याच्यापेक्षा दोन टक्के कमी दराने तुम्हाला व्याज दिले जाते.
 • म्हणजे या ठिकाणी 7.5% हा व्याजदर आहे परंतु त्या कालावधीसाठी दोन टक्के कमी म्हणजे 5.5% दराने तुम्हाला व्याजदर केले जाईल.
New Small Saving Scheme कागदपत्रे
 • अकाउंट ओपनिंग फॉर्म म्हणजे खाते उघडण्यासाठी लागणारा अर्ज
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • नवीन खातेदारकासाठी केवायसी फॉर्म
 • जी रक्कम जमा करणार असाल त्याची पे इन स्लीप
 • मूळ रक्कम/चेक

Tar Bandi Yojana Maharashtra :तार बंदी योजना महाराष्ट्र 2022

Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू

Leave a Comment

error: Content is protected !!