Government schemes complaint ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
अशावेळी शासकीय साहेबांकडून योग्य ती माहिती किंवा मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं आणि नेमकी हीच माहिती आणि हेच मार्गदर्शन न मिळाल्यास सर्वसामान्य माणसाचं किंवा सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक हाल होत असतात.
उदाहरणार्थ घरकुल योजना असेल किंवा विहिरीचे लाभार्थी असतील किंवा ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणारी कोणतीही योजना असेल आणि या सर्व योजनेचा लाभ पात्र असूनही तुम्हाला मिळाला नसेल किंवा लाभ मिळण्यासाठी काही अडचण येत असतील तरी या संदर्भात संबंधित अधिकारी साहेबांची थेट तक्रार करता येते.
या संदर्भात एक शासन परिपत्रक नुकतच काढण्यात आलं आहे.
त्यामुळे आता एखादा अधिकारी किंवा कर्मचारी तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यापासून विनाकारण अडचणीत आणत असेल तर त्या अधिकारी साहेबांची किंवा कर्मचाऱ्यांची तक्रार संबंधित विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने कशी करायची हे जाणून घेऊया.
- महाराष्ट्र शासनाचे 30 जानेवारी 2023 रोजी परिपत्रक काढलेला आहे.
- तुमच्या मोबाईल मधील किंवा वेब ब्राउझर मध्ये grievances.maharashtra.gov.in असे टाईप करा.
- तुम्हाला या ठिकाणी तक्रार दाखल करा आणि तक्रारीची सध्याची स्थिती बघा असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील.
- तक्रार दाखल करा या पर्याया वर क्लिक करा.
- या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक मोबाईल क्रमांक आणि दुसरा ईमेल आयडी.
- तुम्हाला दिलेल्या चौकटीत मोबाईल नंबर व तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे.
- नंतर सत्यापित व्यापारी क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर व ईमेल आयडी वर एक ओटीपी जाणार आहे तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
- ओटीपी टाकल्यानंतर सत्यापित या बटणावर क्लिक करा.
- नंतर नावाची नोंद करा या ठिकाणी तुम्हाला नाव नोंदवायचा आहे तुमचे नाव असेल ते टाईप करा.
- दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक आहे जिल्हा आणि दुसरे मंत्रालय.
- या ठिकाणी गाव तालुका जिल्हास्तरीय कार्यालयाच्या कामकाजा संबंधी तक्रार करायची असेल तर जिल्हा या पर्यायावर क्लिक करा.
- आणि मंत्रालय संदर्भात काही तक्रार करायची असेल म्हणजे धोरणात्मक बाबी अथवा मंत्रालयीन विभागाच्या कामकाजात संबंधित तक्रार.
- जिल्हा ह्या पर्यायावर क्लिक करा आणि या ठिकाणी त्यानंतर जिल्हा व तालुका या ठिकाणी निवडायचा आहे.
- प्रशासनाचा प्रकार निवडायचा आहे तर या ठिकाणी तीन प्रकार तुम्हाला दिसतील जिल्हाधिकारी पोलीस आणि जिल्हा परिषद ज्या संदर्भ तुमची तक्रार आहे तो पर्याय या ठिकाणी निवडा.

लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Government schemes complaint
- खाली प्रशासनाचा प्रकार यामध्ये जिल्हा परिषद हा पर्याय निवडा.
- तक्रारीचे स्वरूप देखील तुम्हाला खाली निवडायचे आहे.
- त्यामध्ये तुम्हाला खूप प्रकारच्या तक्रारीचे स्वरूप दिलेले आहे त्यातून तुमची तक्रार असेल ती सिलेक्ट करा.
- खाली तुम्हाला तुमची जी तक्रार आहे ती तुम्हाला 2000 शब्दात त्या बॉक्समध्ये टाईप करायचे आहे.
- तक्रारी संबंधित जर तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील तर प्रतिमा अपलोड करा या ठिकाणी चॉईस फाईल वर क्लिक करून फोटो अपलोड करा.
- आणि तुमच्याकडे जर त्यासंबंधीत काही दस्तावेज असतील ते सुद्धा तुम्ही तिथे अपलोड करू शकता.
- दस्तावेज म्हणजे कागदपत्र याची साईज दोन्ही एमबी पेक्षा कमी असाव्यात आणि त्या फाईलचा फॉरमॅट पीएनजी जेपीजी जे पी इ जी यात असावा.
- यानंतर खाली तुम्हाला एक कॅपच्या कोड दिलेला असेल तो बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही तुमच्या तक्रारीचा प्रेव्ह्यू बघू शकता.
- यात तुमची तक्रार कुठे जाणार आहे कशी जाणार आहे तक्रारीतील मजकूर काय आहे
- या संदर्भातील प्रेव्ह्यु तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
- हे बघण्यासाठी प्रेव्ह्यू या पर्यायावर क्लिक करा.
- जर तुम्हाला त्यात काही कमतरता वाटत असेल म्हणजेच तुम्हाला काही त्यात अजून मजकूर ऍड करायचे असतील.
- तेव्हा तुम्ही एडिट या बटणावर क्लिक करा नसता कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. Government schemes complaint
Namo Shetkri Yojana:४०००रु. चा पहिला हप्ता आला.
Land Record Fraud : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्या मागील ५ करणे